14 हजार कोटींच्या घोटाळा

Foto
14 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी
ईडीकडून अहमद पटेलांची चौकशी
चौकशी टाळण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी
 
 14 हजार कोटीच्या हायप्रोफाईल संदेसरा घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्‍लागार अहमद पटेल यांची सक्‍त वसुली संचालनालयातर्फे त्यांच्या घरी आज सकाळपासून चौकशी सुरू आहे. कोरोना आणि वयाचा हवाला देत अहमद पटेल यांनी चौकशी टाळण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. मात्र ईडीने घरी जाऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. आज सकाळपासून अहमद पटेल यांच्या दिल्‍लीतील निवासस्थानी त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल आणि जावई इरफान सिद्दीकी यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या कबुली जबाबामुळे अहमद पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत, अशी चर्चा आहे.
संदेसरा महाघोटाळ्यात मागील वर्षी अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल आणि जावई इरफान सिद्दीकी यांचे नाव समोर आल्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली असता या घोटाळ्यात अहमद पटेल यांच्या घराचा वापर संदेसराने मुख्यालयासारखा केल्याचे उघडकीस आले. हा मनीलॉड्रींगचे प्रकरण असून जावई आणि मुलाने यात पैसे घेतल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. अहमद पटेल यांचे नाव समोर आल्यानंतर ईडीतर्फे गेल्यावर्षीपासून त्यांना  समन्स पाठविण्यात येत आहेत. परंतु प्रत्येक वेळी काहीना काही कारण सांगून ते चौकशी टाळत होते. 
यावेळीही आपण 65 वर्षाचे असून सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपण चौकशीसाठी येऊ शकत नाही, असे त्यांनी कळवले होते. त्यांची ही सबब ईडीने यावेळी ऐकून घेतली नाही. वयामुळे आणि कोरोनामुळे आपण येऊ शकत नसला तर आम्ही आपल्या घरी येऊन चौकशी करतो, असे म्हणत ईडीचे अधिकारी आज सकाळीच त्यांच्या निवासस्थानी हजर झाले आणि सकाळपासून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. पटेल यांचा अत्यंत विश्‍वासू सुनील यादव यांनी यापूर्वीच या घोटाळ्यात अहमद पटेल यांचा सहभाग असल्याचा कबुलीजबाब ईडीकडे नोंदविला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker